गेवराई (जि. बीड) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे गोरगरीबांना मोठे हाल सहन करावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शिवछत्र परिवाराकडून गेवराई शहरातील पाच हजार कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे मोफत किट वाटप करण्यात आले आहे.
पद असो वा नसो; मात्र जेव्हा परिस्थिती गंभीर तेव्हा शिवछत्र खंबीर अशी भूमिका समर्थकांनी मांडली.
गेवराई शहरात मोलमजुरी करून दैनंदिन उपजीविका करणाऱ्यांवर कोरोनाच्या संकटामुळे उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरात परिस्थिती गंभीर असल्याने शिवछत्र परिवार या गरजूंच्या मदतीला धावून आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित आणि शिवछत्र परिवाराने शहरातील गरजूंना धान्य, किराणा व जीवनावश्यक वस्तू वाटपाचे नियोजन केले. शहरातील पाच हजार कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक आतकारे, नगरसेवक शाम येवले, ऋषिकेश बेदरे, सभापती जगन पाटील, किशोर कांडेकर, शेख खाजा भाई, आनंद सुतार, सय्यद नजीब, संजय पुरणपोळे, गुफराण इनामदार, दत्ता पिसाळ, शांतीलाल पिसाळ, मन्सूर शेख, जालिंदर पिसाळ, विजय जाधव, कैलास निकम, दत्ता दाभाडे, अक्षय पवार, संदीप मडके यांच्यासह शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मदत वाटपाचे नियोजन करत आहेत.
दरम्यान, यापुढेही आरोग्य यंत्रणेला मोठी मदत करण्यात येणार असल्याची माहिती शिवछत्र परिवाराकडून देण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.